WI vs IND 1st T20I | वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, टीम इंडियाकडून दोघांचं डेब्यू

| Updated on: Aug 03, 2023 | 8:10 PM

West Indies vs India 1st T20i | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेला आज 3 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.

WI vs IND 1st T20I | वेस्ट इंडिजने टॉस जिंकला, टीम इंडियाकडून दोघांचं डेब्यू
Follow us on

त्रिनिदाद | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका ही 1-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर झालेल्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 2-1 ने खिशात घातली. त्यानंतर आता विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आज 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला आहे. विंडिज कॅप्टन रोवमने पॉवेल याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. विंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यातून टीम इंडियाकडून 2 युवा खेळाडूंनी पदार्पण केलं आहे.

विंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाकडून दोघांचं पदार्पण

वेस्ट इंडिज विरुद्धच्या या पहिल्या टी 20 सामन्यातून टीम इंडियाकडून दोघांनी पदार्णप केलं आहे. तिलक वर्मा आणि मुकेश कुमार या दोघांना पदार्पण करण्याची संधी दिली आहे. विशेष बाब म्हणजे मुकेश कुमार याच्यासाठी हा विंडिज दौरा खऱ्या अर्थान अविस्मरणीय ठरलाय. कारण मुकेशने टेस्ट, वनडे आणि त्यानंतर आता टी 20 मध्ये एकाच दौऱ्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये डेब्यू केलं आहे.

युजवेंद्र चहल याला अखेर संधी

युजवेंद्र चहल याला पहिल्या टी 20 साठी संधी देण्यात आली आहे. युजवेंद्रला 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एकदाही संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र अखेर आता चहलची टीम इंडियात एन्ट्री झालीय.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.