त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. मुकेश कुमार याने विंडिज विरुद्ध टेस्ट, वनडेनंतर आाता टी 20 पदार्पण केलं. तर तिलक वर्मा याने वेस्ट इंडिज विरुद्ध आंतरराष्ट्रीय डेब्यू केलं. विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विंडिजने आश्वासक सुरुवात केली. कायले मेयर्स आणि ब्रँडन किंग या जोडीने फटकेबाजीला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या 4 ओव्हरमध्ये 29 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडिया विकेट्सच्या शोधात होती.
टीम इंडिया अडचणीत असताना युजवेंद्र चहल हा मदतीला धावून आला. चहलला विंडिज विरुद्धत्या वनडे सीरिजमध्ये संधी मिळाली नाही. मात्र चहलने त्याचा सर्व हिशोब इथेच केला. चहलने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये एक नाही, तर 2 विकेट्स घेत जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाला विकेट्स मिळवून देत विंडिजला बॅकफुटवर ढकललं.
चहलच्या फिरकीसमोर विंडिजची ओपनिंग जोडी ढेर
Chatur Chahal ne aate he kari wickets☝️ ki pahal ?️
Are you happy to see #YuzvendraChahal spin the game away from the #Windies??#SabJawaabMilenge #JioCinema #WIvIND #TeamIndia pic.twitter.com/2nE36Wz7kU
— JioCinema (@JioCinema) August 3, 2023
चहलने त्याच्या कोट्यातील पहिल्या आणि विंडिजच्या डावातील 5 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर कायले मेयर्स याला 1 रनवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर चहलने ब्रँडन किंग यालही एलबीडब्ल्यू आऊट करत मोठी खेळी करण्यापासून रोखलं. ब्रँडन किंग याने 19 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 28 धावा केल्या. चहलने 3 ओव्हरमध्ये 8 च्या इकॉनॉमीने 24 धावा देत महत्तवाच्या 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.