डोमिनिका | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर टीम इंडिया अनेक दिवस विश्रांतीवर होती. या विश्रांतीनंतर टीम इंडिया आता विंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया या विंडिज दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यासाठी जोरदार तयारी केली आहे. टीम इंडियाचा यशस्वी जयस्वाल कसोटी पदार्पणसाठी सज्ज आहे. टीम इंडिया या कसोटी मालिकेतून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 फेरीला सुरुवात करणार आहे. या निमित्ताने आपण दोन्ही संघातील हेड टु हेड रेकॉर्ड जाणून घेणार आहोत.
टीम इंडियाची गेल्या 2 दशकांमधील वेस्ट इंडिजमधील आकडेवारी जबरस्त अशी आहे. टीम इंडियाने विंडिजमध्ये अखेरची कसोटी मालिका 2002 मध्ये गमावली होती. मात्र तेव्हापासून टीम इंडिया विंडिज विरुद्ध एकही कसोटी मालिकेत पराभूत झालेली नाही. विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2002 नंतर ते आतापर्यंत एकूण 8 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाचा बोलबाला राहिला आहे. टीम इंडियाने 8 पैकी 8 मालिका जिंकल्या आहेत. या 8 मालिकांपैकी 4 भारतात आणि 4 विंडिजमध्ये पार पडल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया दोन्ही ठिकाणी वरचढ असल्याचं सिद्ध होतं.
ब्लू आर्मी अर्थात टीम इंडियाने आतापर्यंत वेस्ट इंडिजमध्ये 51 टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. इथे मात्र टीम इंडियाची पडती बाजू आहे. टीम इंडियाला 51 मधून फक्त 9 सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. तर 16 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय. तर 26 सामने हे अनिर्णित राहिले आहेत, अर्थात दोन्ही संघांनी बरोबरीची लढाई दिली.
क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.