डोमिनिका | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात डोमिनिका इथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने विंडिज विरुद्धच्या या कसोटी मालिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 साखळीची सुरुवात केलीय. विंडिजने या सामन्यात टॉस जिंकला. कॅप्टन क्रेग ब्रेथवेट याने टीम इंडियाला बॉलिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूने इतर खेळाडूंनी जोमदार फिल्डिंग करत चांगली साथ दिली. या दरम्यान मोहम्मद सिराज याने एक नंबर कॅच घेतली. सिराजने अप्रतिम कॅच घेतला. सिराजच्या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मोहम्मद सिराज याने वेस्ट इंडिजच्या जर्मिन ब्लॅकवूड याचा हवेत उडी घेत लाजवाब कॅच घेतली. विंडिजने झटपट विकेट गमावल्याने जर्मिन चौथ्या स्थानी बॅटिंगला आला. जर्मिन 34 बॉलमध्ये 14 धावा करुन आऊट झाला. जर्मिनने रविंद्र जडेजा याच्या बॉलिंगवर शॉट मारला. हा फटका सिराजपासून काही अंतरावर होता.
सिराजने ते अंतर धावत कमी केलं. आता सिराज आणि बॉलमध्ये काही मीटरचं अंतर राहिलं. बॉल जमिनीवर पडणार तेवढ्यात सिराजने हवेत उडी घेत एकहाती कडक कॅच घेतला आणि जर्मिनला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एका बाजूला विकेट गेल्याचा आनंद होता. तर दुसऱ्या बाजूला सिराजला लागलं तर नाही ना, ही चिंता प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर दिसत होती. कारण सिराजने कॅच पकडल्यानंतर केलेली कृती. मात्र सुदैवाने सिराजला अजिबात खरचटलं नाही.
फुसका शॉट कडक कॅच
Miyaan Bhai ki daring ? #INDvWIonFanCode #WIvIND pic.twitter.com/LUdvAmmbVr
— FanCode (@FanCode) July 12, 2023
कॅचसाठी डाईव्ह मारलेल्या सिराजला टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनी हात देत उभ केलं. काहींनी त्याचं कौतुक केलं, तर कुणी पाठीवर शाबासकीची थाप दिली. इतकंच काय, बीसीसीआयनेही सिराजचा फोटो ट्विट केलाय.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.