डोमिनिका | वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव घोषित केला आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 152.2 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 421 धावा केल्या. यासह टीम इंडियाने पहिल्या डावात विंडिजवर 271 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून सलामी जोडीने यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा या दोघांनी शतकी खेळी केली. तर विराट कोहली याने अर्धशतक ठोकलं.
टीम इंडियाचा डाव घोषित
Innings Break! #TeamIndia declare at 421/5, with a lead of 271 runs ?
Scorecard ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #WIvIND pic.twitter.com/8PfxVKZJzp
— BCCI (@BCCI) July 14, 2023
यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात 387 बॉलमध्ये 171 धावांची खेळी केली. यशस्वीने या खेळीत 16 चौकार आणि 1 षटकार ठोकला.यशस्वी पदार्पणात शतक करणारा सलग तिसरा आणि एकूण 17 वा भारतीय ठरला. इतकंच नाही तर टेस्ट डेब्यूत सेंच्युरी झळकावणारा तिसरा ओपनर ठरला. यशस्वीने या खेळीसह अनेक कीर्तीमान केले.
रोहित शर्मा 221 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 10 फोरसह 103 रन्स केल्या. रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील हे एकूण 10 वं तर विंडिज विरुद्धचं दुसरं शतक ठरलं. रोहितला मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र रोहितला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करण्यात अपयश आलं.
यशस्वी आणि रोहित व्यतिरिक्त विराट कोहली याने अर्धशतक केलं. विराट 76 धावा करुन माघारी परतला. शुबमन गिल 6 आणि अजिंक्य रहाणे याने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर रविंद्र जडेजा 37 आणि इशान किशन 1 धावेवर नाबाद खेळत असताना रोहितने डाव घोषित केला. विंडिजकडून केमार रोच, अल्झारी जोसेफ, एलिक एथानझे, रहकीम कॉर्नवॉल आणि जोमे वॉरिकन या 5 जणांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.