डोमिनिका | वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने दमदार कामगिरी केली आहे. रोहितने विंडिज विरुद्धच्या या सामन्यातील दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक ठोकलं. रोहितने 220 बॉलमध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने हे शतक केलं. रोहितच्या कसोटी कारकीर्दीतील हे 10 वं शतकं ठरलं. तसेच रोहितचं हे 2023 या वर्षातील दुसरं कसोटी शतक ठरलं. रोहितने फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंच्युरी केली होती. रोहितने तेव्हा नागपूरमधील व्हीसीएत 120 धावा केल्या होत्या.
रोहित शर्माचं शतकी सेलिब्रेशन
The Moment when Captain rohit sharma scored his century !!#WIvIND #RohitSharmapic.twitter.com/bHIzrN3RvT
— Mufaddal Vohra (@SohitPathak_07) July 13, 2023
रोहितने विंडिज विरुद्ध तब्बल 10 वर्षांनी शतक केलं. रोहितने 10 वर्षांआधी विंडिज विरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावलं होतं.
रोहितला शतक ठोकल्यानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र रोहितला तसं काही करता आलं नाही. रोहितने शतकानंतर 3 धावा जोडल्या आणि आऊट झाला. रोहितने 103 धावांची खेळी केली.
रोहितचं हे एकूण 44 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. रोहितने या शतकासह ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ याच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. यासह रोहित स्टीव्हनसह संयुक्तरित्या तिसरा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा सक्रीय फलंदाज ठरला.
रोहित आणि यशस्वी या सलामी जोडीने विंडिज विरुद्ध 150 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 229 धावांची भागीदारी केली. या दरम्यान यशस्वी आणि रोहित या दोघांनी वैयक्तिक शतकं पूर्ण केली. यशस्वीचं हे पदार्पणातील शतक ठरलं. यशस्वी डेब्यूत परदेशात शतक करणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला. तसेच या दोघांनी 200 धावांची भागीदारी पूर्ण करत इतिहास रचला. रोहित-यशस्वी विंडिज विरुद्ध विक्रमी सलामी भागीदारी करणारी जोडी ठरली.
दरम्यान टीम इंडिया दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 113 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 312 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे 162 धावांची मोठी आघाडी आहे. विराट 36 आणि यशस्वी 143 धावांवर नाबाद आहे. तर रोहित 103 आणि शुबमन गिल 6 धावा करुन माघारी परतला.
दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र विंडिजचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. आर अश्विन याने 5, रविंद्र जडेजा याने 3, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत विंडिजला 150 धावांवर ऑलआऊट केलं.