मुंबई | टीम इंडिया पुढच्या म्हणजेच जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या वेस्टइंडिज दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी 20 सामन्यांच्या अशा एकूण 3 मालिका असणार आहेत. टीम इंडियाच्या या विंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर दौऱ्याची सांगता ही 13 ऑगस्टला होणार आहे. या विंडिज दौऱ्यासाठी अजून भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र या दौऱ्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतर मोठे बदल होणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. याआधी मोठी अपडेट समोर आली आहे.
टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याला विंडिज विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. वर्कलोडमुळे टीम मॅनेजमेंट शमीला विश्रांती गेऊ शकते. शमी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने क्रिकेट खेळतोय, त्यामुळे आगामी मोठ्या क्रिकेट स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शमीला विश्रांती देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मोहम्मद शमी याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप याने नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाकडून 4 विकेट्स घेतल्या होत्या. शमी गेल्या काही महिन्यांपासून उल्लेखनीय कामगिरी करतोय. शमी आयपीएल 16 मोसमात सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप विनर ठरला होता. शमी या हंगामातील 17 सामन्यांमध्ये 8.03 च्या इकॉनमी रेटने 28 विकेट्स घेतल्या होत्या. शमीची 11 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स ही सर्वोच्च कामगिरी राहिली.
मोहम्मद शमी याने आतापर्यंत टीम इंडियाचं 64 कसोटी, 90 वनडे आणि 23 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. शमीने कसोटी, वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 229, 162 आणि 24 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डोमिनिका.
दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.
दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.
तिसरा सामना – 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.
टी 20 सीरिज
पहिला सामना – 4 ऑगस्ट
दुसरा सामना – 6 ऑगस्ट
तिसरा सामना – 8 ऑगस्ट
चौथ्या सामना – 12 ऑगस्ट
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.