मुंबई | आयसीसी क्रिकेट वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला काही महिनेच बाकी आहेत. भारताला या वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा मान 12 वर्षांनी मिळाला आहे. टीम इंडिया या आगामी आयसीसी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारीला लागलीय. टीम इंडिया आशिया कप आणि त्याआधी आता विंडिज दौरा करणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20 मालिकाही खेळणार आहे. ऋषभ पंत याच्या अपघातामुळे टीम इंडियात विकेटकीपर बॅट्समन म्हणून कोण हा गेल्या अनेक महिन्यांपासूनचा प्रश्न आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत केएस भरत, इशान किशन आणि केएल राहुल या तिघांना विकेटकीपर बॅट्समन म्हणून संधी देऊन पाहिली. मात्र या तिघांना आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळे निवड समिती आता संजू सॅमसन याच्यावर विश्वास दाखवून संधी देऊ शकते. संजू सॅमसन याला अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियात संधी मिळू शकते.
टीम इंडिया जुलै-ऑगस्ट महिन्यादरम्यान टी 20, वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने या दौऱ्यात पार पडणार आहेत. संजूला या वनडे आणि टी 20 मालिकेत संधी मिळू शकते. संजू प्रतिभावान खेळाडू आहे. तो बॅटिंगसह विकेटकीपिंगही करतो. संजूकडे निवड समितीने अनेक वेळा दुर्लक्ष केलंय. त्यामुळे यंदातरी त्याला संधी देऊन गेम दाखवण्यचाी संधी द्यावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट चाहत्यांची आहे.
संजू सॅमसन याची विंडिज दौऱ्यात निवड होण्याची शक्यता
Sanju Samson is set to return to the ODI & T20I squad for West Indies tour. [Cricbuzz] pic.twitter.com/V9iifJwbjN
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2023
दरम्यान टीम इंडियाच्या या विंडिज दौऱ्याची सुरुवात ही 12 जुलैपासून कसोटी मालिकेने होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतर टीम मॅनेजमेंट कसोटी मालिकेसाठीही संघात बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता नक्की काय होतंय,हे लवकरच स्पष्ट होईल.
पहिला सामना – 12 ते 16 जुलै, डोमिनिका.
दुसरा सामना – 20 ते 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन.
पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.
दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.
तिसरा सामना – 1 ऑगस्ट, त्रिनिदाद
पहिला सामना – 4 ऑगस्ट
दुसरा सामना – 6 ऑगस्ट
तिसरा सामना – 8 ऑगस्ट
चौथ्या सामना – 12 ऑगस्ट
पाचवा सामना – 13 ऑगस्ट