मुंबई | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर विजय मिळवत इतिहास रचला. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमधील चॅम्पियन टीम ठरली. तसेच ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व स्पर्धांचं जेतेपद जिंकणारी टीम ठरली. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभव झाला. ऑस्ट्रेलिया विजयासाठी दिलेल्या 444 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 234 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा 209 धावांच्या मोठ्या फरकाने विजय झाला.
आता टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे. टीम इंडिया आता वेस्टइंडिज विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडिया विंडिज दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने सोमवारी 12 जून रोजी टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियात मोठे बदल होणं अपेक्षित आहेत. या मालिकेत वरिष्ठांना आराम तर युवांना संधी देण्यात येणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे.
विडिंज विरुद्धच्या या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियात यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंह या दोघांना संधी मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. या युवा खेळाडूंनी आयपीएल 16 व्या मोसमात तडाखेदार बॅटिंग केली होती.
टीम इंडियाच्या विंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
? NEWS ?
2️⃣ Tests
3️⃣ ODIs
5️⃣ T20IsHere's the schedule of India's Tour of West Indies ?#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/U7qwSBzg84
— BCCI (@BCCI) June 12, 2023
टीम इंडिया टी 20 आधी कसोटी आणि वनडे सीरिजही खेळणार आहे. या टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील. कारण आगामी एकदिवसीय वर्ल्ड कप आणि आशिया कप स्पर्धेच्या तयारीने विंडिज विरुद्धच्या या मालिका महत्वाच्या अशा आहेत. तर अनुभवी खेळाडूंना टी 20 मालिकेतून विश्रांती दिला जाऊ शकते. त्यामुळे अर्थात या टी 20 सीरिजसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी मिळणार हे निश्चित समजंल जात आहे.
हार्दिक पांड्या (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, ईशान किशन, रिंकू सिंह, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार आणि वाशिंगटन सुंदर,