मुंबई | वूमन्स क्रिकेट टीम इंडिया बांगलागदेश दौऱ्याची सुरुवात 9 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर मेन्स टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या विंडिज दौऱ्यामध्ये कसोटी, वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर क्रिकेट मैदानात परतणार आहे. टीम इंडिया कसोटी मालिकेत 2 सामने खेळणार आहे.
टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 फेरीचा श्रीगणेशा करणार आहे. या दौऱ्याआधी टीम इंडियाच्या गोटात मोठा खेळाडू सामील झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर विराट लंडनहून थेट बारबाडोस इथे पोहचला आहे. तसेच टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड घालवला. त्यानंतर रोहित टीम इंडियासोबत जोडला गेला आहे.
????????? ?????????! ?
Ishan Kishan takes over the camera to shoot #TeamIndia's beach volleyball session in Barbados ??
How did Ishan – the cameraman – do behind the lens ?#WIvIND | @ishankishan51 pic.twitter.com/ZZ6SoL93dF
— BCCI (@BCCI) July 3, 2023
रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडू बारबाडोसमध्ये व्हॉलीबॉलचा आनंद लूटला. बीसीसीआयने बेसबॉलचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हीडिओमध्ये विराट कोहली, ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडू दिसतायेत. तसेच हेड कोच राहुल द्रविडही दिसून येत आहे.
दरम्यान कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात वनडे आणि त्यानंतर टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. कसोटी मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद आणि अजिंक्य रहाणे उपकर्णधारपद सांभाळणार आहे. तर वनडे मालिकेत हार्दिक पंड्या याच्याकडे कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत.
रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट आणि नवदीप सैनी.