त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 1 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभयसंघात 3 ऑगस्टपासून 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या मालिकेच्या 48 तासांआधी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मालिकेसाठी टीममध्ये एकूण 5 खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे विंडिज टीमची ताकद आणखी वाढली आहे.
रोवमॅन पॉवेल हा टी 20 मालिकेत वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर टीममध्ये जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन, ओडियन स्मिथ, जेसन होल्डर आणि ओबेद मॅकॉय या पाच जणांची एन्ट्री झालीय.
या पाचही खेळाडूंचा टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत समावेश केला नव्हता. मात्र विंडिज क्रिकेट बोर्डाने आपली चुक सुधारत या पाचही जणांना टी 20 मालिकेत संधी दिली. विंडिजच्या विस्फोटक निकोलस पूरन याने मेजर क्रिकेट लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स न्यूयॉर्ककडून खेळताना अंतिम सामन्यात 55 बॉलमध्ये 137 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियासमोर या मालिकेत तगडं आव्हान असणार आहे.
टी 20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असला, तरीही प्रत्येक मॅचसाठी 13 खेळाडूंचीच निवड केली जाईल. या 13 मधून 11 जणांना संधी दिली जाईल.
टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी विंडिज संघ जाहीर
West Indies have added some experience for their T20I series against India ?
Full squad ⬇️https://t.co/T7stjfdDuz
— ICC (@ICC) August 1, 2023
तर बीसीसीआयने 5 जुलै रोजी टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. हार्दिक पंड्या याच्याकडे टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 13 ऑगस्टला पाचवा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येईल.
पहिला सामना, 3 ऑगस्ट.
दुसरा सामना, 6 ऑगस्ट.
तिसरा सामना, 8 ऑगस्ट.
चौथा सामना, 12 ऑगस्ट.
पाचवा सामना 13 ऑगस्ट.
टी 20 सीरिजसाठी विंडिज टीम | रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.