बार्बाडोस | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 5 विकेट्सने जिंकला. विंडिजने विजयासाठी दिलेलं 115 धावांचं आव्हान टीम इंडियाने 22.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे. दुसरा सामना शनिवारी 29 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा 29 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचं आयोजन हे केंसिंग्टन ओव्हल बार्बाडोस इथे करण्यात आलंय.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया दुसरा वनडे सामना हा टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना हा जिओ एपवर पाहता येईल.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजाठी वेस्ट इंडिज संघ | शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.