गयाना | तिलक वर्मा याचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्याचा कित्ता दुसऱ्या टी 20 सामन्यातही गिरवला आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी विंडिज विरुद्ध दुसऱ्या टी 20 निराशाजनक कामगिरी केली. मात्र तिलक वर्मा, कॅप्टन हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या तिघांनी टीम इंडियाची लाज राखली. या तिघांनी केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाला 150 धावांचा टप्पा पार करता आला. टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. त्यामुळे विंडिजला 153 धावांचं आव्हान मिळालंय.
टीम इंडियाकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. तिलकने 41 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तिलक वर्मा याचं पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरलं. ईशान किशन याने 23 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हार्दिकने 24 धावा जोडल्या. अक्षर पटेल 14 रन्स करुन माघारी परतला. रवि बिश्नोई याने 8 आणि अर्शदीप सिंह याने नाबाद 6 धावा केल्या.
विंडिजसमोर 153 रन्सचं टार्गेट
Innings Break!
After opting to bat first, #TeamIndia post a total of 152/7 on the board.
Tilak Varma top scored with 51 runs.
Scorecard – https://t.co/9ozoVNatxN… #WIvIND pic.twitter.com/WBiaV9xjBC
— BCCI (@BCCI) August 6, 2023
तर शुबमन गिल, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे त्रिकूट सुपर फ्लॉप ठरलं. सूर्याने 1, संजू आणि शुबमन दोघांनी प्रत्येकी 7 धावा केल्या. विंडिजकडून अकील होसैन, अल्झारी जोसेफ आणि रोमरिया शेफर्ड या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.