त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे त्रिनिदादमधील पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्कमध्ये खेळवण्यात येत आहे. विंडिजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी टीम इंडियाला शानदार सुरुवात मिळवून दिली त्यासह दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी केली.
यशस्वी आणि रोहित या सलामी जोडीने अवघ्या 20.5 ओव्हरमध्ये शतकी भागीदारी केली. यासह सलामी जोडीच्या नावावर विक्रम झाला. या जोडीने विंडिज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 229 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली होती. आता दुसऱ्या सामन्यात शतकी भागीदारी रचत रोहित आणि यशस्वीने भीमपराक्रम केला आहे.
टीम इंडियाचे दिग्गज लिटिल मास्टर अर्खात सुनील गावसकर यांनी 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत शतकी भागीदारी केली आहे. त्यानंतर आता रोहित आणि यशस्वी या जोडीने सलग 2 सामन्यांमध्ये अशी कामगिरी केलीय. गावसकर यांनी अरुण लाल, अंशुमन गायकवाड, आणि फारुख इंजिनियर यांच्यासोबत प्रत्येकी 2 वेळा शतकी भागीदारी केलीय. या यादीत वीरेंद्र सेहवाग आणि मुरली विजय यांचाही समावेश आहे. या जोडीने सलग 3 वेळा कसोटीत शतकी भागीदारी रचली.
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवशी ताज्या आकडेवारीनुसार 73 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 260 धावा केल्या आहेत. विराट कोहली 67 आणि रविंद्र जडेजा 28 धावांवर आहेत. तर रोहित शर्मा 80, यशस्वीने 57, शुबमन गिल याने 10 आणि अजिंक्य रहाणे 8 धावा करुन तंबूत परतले.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.