त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर 1 डाव आणि 141 रन्सने विजय मिळवला. त्यानंतर आता दुसरा सामना हा रंगतदार स्थितीत पोहचला आहे. टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी चौथ्या दिवशी 365 रन्सचं टार्गेट दिलं. विंडिजने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 76 धावा केल्या. त्यामुळे आता पाचव्या दिवशी विंडिजला विजयासाठी आणखी 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला विंडिजचा व्हॉईटवॉश करण्यासाठी 8 विकेट्सची गरज आहे. मात्र त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पाचव्या दिवसाच्या खेळाआधी हवामानाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. चौथ्या दिवशी पावसाने अनेकदा खोडा घातला. त्यामुळे खूप वेळ वाया गेला. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने सामन्याचा पाचवा दिवस हा निर्णायक असणार आहे. वेदर डॉट कॉम या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, पाचव्या दिवशी 80 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाच्या या शक्यतेमुळे दोन्ही संघांचं टेन्शन वाढलंय.
पावसामुळे पाचव्या दिवशी विलंब
Getting ready for adult fun at "Buster and Dave's"
— ShadowStep (@ShadowStep) May 3, 2009
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने चौथ्या दिवशी 5 विकेट्स घेतल्या. विंडिजला 255 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने पहिल्या डावात183 रन्सची लीड घेतली. तर दुसऱ्या डावात 24 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 181 रन्स केल्या. त्यामुळे टीम इंडियाकडे 364 धावांची आघाडी झाली. कॅप्टन रोहित शर्मा याने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे विंडिजला 365 धावांचं आव्हान मिळालं.
विंडिजने चौथ्या दिवसापर्यंत 76 धावा करुन 2 विकेट्स गमावल्या. त्यामुळे विंडिजला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 289 धावा करायच्या आहेत. मात्र पावसाच्या अंदाजामुळे आता पाचव्या दिवशी काय होतंय, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान त्याआधी टीम इंडियाने दुसऱ्या डावात वनडे स्टाईल बॅटिंग करत 181 धावा केल्या. या दरम्यान टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने 58 रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल याने 38 धावा केल्या. ईशान किशन याने सिक्स ठोकत टेस्ट करिअरमधील पहिलीवहिली फिफ्टी ठोकली. ईशानने 34 बॉलमध्ये नाबाद 52 धावा केल्या. तर शुबमन गिल 29 रन्सवर नॉट आऊट परतला.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.