WI vs IND 2nd Test | दुसऱ्या कसोटीनंतर टीम इंडियाला मोठा झटका, कॅप्टन रोहित शर्मा याचं टेन्शन वाढलं

| Updated on: Jul 25, 2023 | 4:55 PM

WI vs IND 2nd Test Result | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पाचवा दिवसाचा संपूर्ण खेळ हा पावसामुळे वाया गेला. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला.

WI vs IND 2nd Test | दुसऱ्या कसोटीनंतर टीम इंडियाला मोठा झटका, कॅप्टन रोहित शर्मा याचं टेन्शन वाढलं
Follow us on

त्रिनिदाद | पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी 2 कसोटी सामने हे अनिर्णित राहिले. एशेस सीरिजमधील चौथ्या सामन्यातील पाचव्या दिवशी (23 जुलै) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अखेर चौथा सामना ड्रॉ राहिला. परिणामी इंग्लंडचा मालिका जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. तर ऑस्ट्रेलियाने मालिका कायम राखली. तर 24 जुलै रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यातील पाचव्या दिवशी पाऊस झाला. हा पाऊस थांबलाच नाही. नॉनस्टाप झालेल्या पावसामुळे पाचव्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. या पावसामुळे विंडिजचा पराभव टळला. तर टीम इंडियाला असलेली व्हॉटवॉशची संधी पावसाने हिरावून घेतली.

टीम इंडियाने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाचा विंडिज विरुद्धचा हा सलग नववा कसोटी मालिका विजय ठरला. मात्र दुसरा सामना ड्रॉ राहिल्याने टीम इंडियाला मोठं नुकसान सहन करावं लागलंय. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फटका बसलाय.

हे सुद्धा वाचा

दुसरा सामना ड्रॉ झाल्यामुळे विंडिज आणि टीम इंडियाला प्रत्येकी 4 पॉइंट्स मिळाले. सामना जिंकणाऱ्या टीमला 12 आणि टाय झाल्यास 6 पॉइंट्स मिळतात. मॅच ड्रॉ झाल्याने टीम इंडियाच्या खात्यात 4 आणि आधीचे 12 असे एकूण 16 पॉइंट्स झाले. मात्र यामुळे टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत मोठी घसरण झाली. याचा फायदा हा पाकिस्तानला झाला. पाकिस्तानने थेट या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. त्यामुळे टीम इंडियाची दुसऱ्या क्रमांकावर पिछेहाट झाली.

पाकिस्तानला मोठा फायदा

टीम इंडियाला मोठा फटका

दुसरा सामना ड्रॉ राहिल्याने टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 100 वरुन 66.67 इतकी झालीय. तर एकूण पॉइंट्स 16 झाले आहेत. तर पाकिस्तानने श्रीलंकेचा पहिल्या कसोटीत पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तानच्या नावावर 12 पॉइंट्स आहेत. पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. टीम इंडिया दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या आणि वेस्ट इंडिज पाचव्या क्रमांकावर आहे.

दरम्यान कसोटी मालिकेनंतर वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे.