Ishan Kishan याचा Rishabh Pant च्या बॅटने एकहाती कडक सिक्स आणि पहिलं अर्धशतक, व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Jul 24, 2023 | 4:59 PM

Ishan Kishan thanks Rishabh Pant | ईशान किशन याने ऋषभ पंतच्या बॅटने खणखणीत सिक्स ठोकून पहिली टेस्ट फिफ्टी पूर्ण केली.

Ishan Kishan याचा Rishabh Pant च्या बॅटने एकहाती कडक सिक्स आणि पहिलं अर्धशतक, व्हीडिओ व्हायरल
Follow us on

त्रिनिदाद | टीम इंडियाचा युवा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात 33 बॉलमध्ये खणखणीत अर्धशतक पूर्ण केलं. ईशानने सामन्याच्या चौथ्या दिवशी ही कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे ईशानची ही पहिली अर्धशतकी खेळी आणखी एका अर्थान खास ठरली, ते म्हणजे त्याने मारलेला सिक्स. ईशानने एका हाताने सिक्स ठोकून फिफ्टी पूर्ण केली.ईशानने केमार रोच याच्या बॉलिंगवर हा सिक्स खेचला. ईशानने टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याच्या बॅटने हा चमत्कार केला. त्यामुळे पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ईशान दुसऱ्या डावात पंतच्या बॅटने बॅटिंग केली. ईशानच्या हातातील बॅटवर ‘RP17’ असं स्पष्टपणे दिसतंय. ईशानने दुसऱ्या डावात 34 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 कडक सिक्ससह नाबाद 52 धावा केल्या. कॅप्टन रोहित शर्मा टीम इंडियाचा दुसरा डाव 24 ओव्हरमध्ये 2 बाद 181 धावांवर घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला विजयासाठी 365 धावांचं आव्हान मिळालं.

हे सुद्धा वाचा

पंतच्या बॅटने ‘ईशान’दार सिक्स

ईशानने विंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीतून पदार्पण केलं. तेव्हा ईशानला पहिल्या धावेसाठी 20 चेंडूंचा सामना करावा लागला होता. तर ईशानने दुसऱ्या टेस्टमधील पहिल्या डावात 37 बॉलमध्ये 25 धावा केल्या.

विंडिजला आणखी 289 धावांची गरज

दरम्यान वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी 365 धावांचा पाठलाग करताना 32 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 76 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे आता विंडिजला विजयासाठी आणखीन 289 धावा कराव्या लागणार आहेत. टॅगनरिन चंद्रपॉल 24 आणि जेरमेन ब्लॅकवूड 20 धावांवर नाबाद आहेत. तर कॅप्टन क्रेग ब्रॅथवेट 28 धावा करुन बाद झाला. तर क्रिक मॅकेंझी झिरोवर माघारी परतला. आर अश्विन याने दोन्ही विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, जर्मेन ब्लॅकवुड, अलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन आणि शॅनन गॅब्रिएल.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.