Hardik Pandya | हार्दिक पंड्या याचा विंडिज विरुद्ध तडाखा, 2 दिग्गजांचा रेकॉर्ड उध्वस्त

| Updated on: Aug 02, 2023 | 7:10 PM

Hardik Pandya West Indies vs India | हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात टीम इंडियाने विंडिज विरुद्ध 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. हार्दिकने तिसऱ्या सामन्यात विक्रमी कामगिरी केली.

Hardik Pandya | हार्दिक पंड्या याचा विंडिज विरुद्ध तडाखा, 2 दिग्गजांचा रेकॉर्ड उध्वस्त
Follow us on

त्रिनिदाद | टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत विस्फोटक खेळी केली. हार्दिकने या दरम्यान मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. हार्दिक विंडिज विरुद्ध एका सामन्यात सर्वाधिक सिक्स ठोकणारा भारतीय संघाचा कर्णधार ठरला. हार्दिकने यासह माजी कर्णधार विराट कोहली आणि कपिल देव या दोघांना पछाडलं.

हार्दिकने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात फटकेबाजी करत फिनीशिंग टच दिला. हार्दिकने 52 बॉलमध्ये 70 धावांची नाबाद खेळी केली. हार्दिकने या खेळीत 4 फोर आणि 5 सिक्स ठोकले. हार्दिक यासह विंडिज विरुद्ध कर्णधार म्हणून एका वनडेत सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिला भारतीय ठरला. हार्दिकच्या आधी विराटने 2017 मध्ये 4 सिक्स ठोकले होते. तर शिखर धवनने 2022 मध्ये 3 सिक्स फटकावलेले. तर कपिल देव यांनी 1983 साली 3 सिक्स खेचलेले.

हार्दिक विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला. हार्दिकने सुरुवातीला संथ आणि सावध सुरुवात केली. हार्दिकने 24 बॉलमध्ये 12 धावा केल्या. मात्र त्यानंतर हार्दिकने टॉप गिअर टाकला. हार्दिकने दे दणादण फटकेबाजी केली. शेवटच्या काही ओव्हरमध्ये हार्दिकने मैदानात चारही दिशेला शॉट मारले. हार्दिकच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 350 पार मजल मारता आली.

हे सुद्धा वाचा

विंडिज विरुद्ध एका डावात सर्वाधिक सिक्स

कपिल देव – 3 सिक्स, 1983.
विराट कोहली – 4 सिक्स, 2017.
शिखर धवन – 3 सिक्स, 2022.
हार्दिक पंड्या – 5 सिक्स, 2023.

आता टी 20 मालिकेचा थरार

दरम्यान कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर आता विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा ही मालिकाही जिंकून परतण्याचा मानस असणार आहे. तर विंडिजच्या गोटात घातक खेळाडूंची एन्ट्री झालीय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

टी 20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट टीम

रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया

हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार