त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि ईशान किशन या सलामी जोडीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. विंडिज विरुद्ध ईशान आणि शुबमन या दोघांनी 143 धावांची सलामी भागीदारी केली. टीम इंडियाकडून विंडिज विरुद्ध पहिल्या विकेटसाठी ही रेकॉर्ड पार्टनरशीप ठरली. शुबमन आणि ईशान या दोघांनी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन या ओपनिंग जोडीचा 2017 मधील रेकॉर्ड उद्धवस्त केला. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी 2017 मध्ये विंडिज विरुद्ध त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल इथे 132 रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली होती.
ईशान किशन आणि शुबमन गिल या दोघांनी विंडिज विरुद्ध कोणत्याही विकेटसाठी दुसऱ्या सर्वात मोठ्या पार्टनरशीपचा रेकॉर्डही रचला. याआधी टीम इंडियासाठी 2007 वर्ल्ड कपमध्ये बर्मूडा विरुद्ध सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 202 धावांची द्विशतकी भागीदारी केली होती.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.
विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.