त्रिनिदाद | टीम इंडियाचा युवा आणि विकेटकीपर ओपनर बॅट्समन ईशान किशन याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक ठोकलंय. ईशानने गुडकेश मोती याच्या बॉलिंगवर 14 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर एक धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. ईशानने 43 चेंडूंच्या मदतीने हे अर्धशतक ठोकलं. विशेष बाब म्हणजे
ईशानचं वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं. तसेच ईशानने ही तिन्ही अर्धशतकं सलामीला येत ठोकली आहेत. ईशानने या अर्धशतकासह मोठा विक्रम केला आहे.
ईशानने याआधी विंडिज विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात 46 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात 55 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 55 रन्स केल्या. तर आता तिसऱ्या सामन्यात ईशान 43 बॉलच्या मदतीने हे अर्धशतक केलं. ईशानच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे सहावं अर्धशतक ठरलं.
‘ईशान’दार कामगिरी
3️⃣rd successive half-century in the ODI series for Ishan Kishan ✅
100-run opening stand between him & Shubman Gill ✅#TeamIndia off to a flying start in the third & final ODI ? ?
Follow the match ▶️ https://t.co/boUPUpG2HZ #WIvIND pic.twitter.com/PQpSWtnLGY
— BCCI (@BCCI) August 1, 2023
दरम्यान ईशान किशन हा 3 सामन्यांच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सलग 3 अर्धशतक करणारा एकूण सहावा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी टीम इंडियाकडून के श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, महेंद्र सिंह धोनी आणि श्रेयस अय्यर या 5 जणांनी हा कारनामा केला होता.
ईशानने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकत विक्रम केला. मात्र ईशानने गेल्या 2 सामन्यात केलेली चूक पुन्हा केली. ईशानला अर्धशतकाचं शतकात रुपांतर करण्यात पुन्हा अपयशी ठरला. ईशान 77 धावा करुन आऊट झाला. ईशानने 64 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 8 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली.
दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम इंडियात 2 बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना तिसऱ्या सामन्यातही विश्रांती दिली गेलीय. तर अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकट या दोघांना संधी देण्यात आली आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.
विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.