WI vs IND 3rd Odi | तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना रद्द होणार?

| Updated on: Jul 31, 2023 | 11:48 PM

West Indies vs India 3rd Odi Weather Report | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा 1 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत आहे.

WI vs IND 3rd Odi | तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना रद्द होणार?
Follow us on

त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात खेळवण्यात येत असलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका ही निर्णायक वळणावर आहे. वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. तिसरा, अंतिम आणि निर्णायक सामना हा 1 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासह मालिका जिंकण्याच्या इच्छेने टीम इंडिया 1 ऑगस्टला मैदानात उतरणार आहे. अतिशय महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा सामना असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं टीममध्ये कमबॅक होण्याची शक्यता आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात पावसामुळे गेम होऊ शकतो.

एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. हवामानानुसार 1 ऑगस्टला पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ शकतो. सामन्यादरम्यान पाऊस होण्याची 41 टक्के शक्यता आहे. इतकंच नाही, तर दुपारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ही 25 टक्के इतकी आहे.

ब्रायन लारा स्टेडियममधील आकडेवारी (Pitch Report at Brian Lara Stadium)

मालिका बरोबरीत असल्याने टीम इंडिया वेस्ट इंडिज दोन्ही संघांना मालिका विजयाची संधी समसमान आहे. ब्रायन लारा स्टेडियममध्ये धावा करणं आव्हानात्मक राहिलंय. या स्टेडियममध्ये आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आले आहेत. या 3 पैकी 1 वेळा पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना दोनदा विजय झाला आहे.

हे सुद्धा वाचा

या मैदानात आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या 3 सामन्यात एकाही टीमला 200 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. या स्टेडियममधील पहिल्या डावातील एव्हरेज स्कोअक हा 160 इतका आहे. त्यामुळे या पीचवर धावा करणं किती आव्हानात्मक आहे, याची कल्पना येते. त्यामुळे टॉस जिंकून पावसाची चिन्ह पाहता पहिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. त्यामुळे या सामन्यात टॉस फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजाठी वेस्ट इंडिज संघ | शाई होप (कॅप्टन), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.