त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात टॉस उडवण्यात आला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने टॉस जिंकला आहे. विंडिज कॅप्टन शाई होप याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया 3 सामन्यांची मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे हा तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असा आहे. टीम इंडियासाठी सामना जिंकणं प्रतिष्ठेचा विषय झालाय. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात टीम इंडियात 2 बदल करण्यात आले आहेत.
टीम इंडियात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना तिसऱ्या सामन्यातही विश्रांती दिली गेलीय. त्यामुळे उपकर्णधार हार्दिक पंड्या हाच नेतृत्व करणार आहे. तर अक्षर पटेल आणि उमरान मलिक यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि जयदेव उनाडकट या दोघांना संधी देण्यात आली आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात बदल
A look at #TeamIndia‘s Playing XI for the third and final ODI.
Two changes – Ruturaj Gaikwad and Jaydev Unadkat come in the XI for Umran Malik and Axar Patel. #WIvIND pic.twitter.com/WZHOXVARFb
— BCCI (@BCCI) August 1, 2023
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांना पुन्हा एकदा विश्रांती देण्यात आली आहे. या दोघांना दुसऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. परिणामी टीम इंडियाची दुसऱ्या सामन्यात घसरगुंडी झाली होती. टीम इंडियाचे फलंदाज सपशेल फेल ठरले होते. विंडिजने दुसऱ्या सामन्यात या संधीचा फायदा घेत विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
त्यामुळे आता तिसरा सामना हा रंगतदार स्थितीत पोहचला. टीम इंडियाने विंडिज विरुद्ध 2006 पासून एकही मालिका गमावलेली नाही. पण आता मालिका बरोबरीत असल्याने टीम इंडियावर मालिका पराभवाची टांगती तलवार आहे. त्यामुळे या तिसऱ्या सामन्यात रोहित-विराट खेळतील, असं म्हटलं जात होतं. मात्र दोघांना पुन्हा विश्रांती दिली गेली. त्यामुळे आता टीम इंडियाच्या युवा शिलेदारांवर चमकदार कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि जयदेव उनाडकट.
विंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायल मेयर्स, ब्रँडन किंग, एलिक एथनेज, शिमरॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, केसी कार्टी, यानिक कॅरिया, अल्झारी जोसफ, जेडन सील्स आणि गुडकेश मोती.