गयाना | सलग 2 सामन्यात पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासाठी विंडिज विरुद्धचा तिसरा सामना हा ‘करो या मरो’ असा झाला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात टीम इंडियावर 4 धावांनी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात 2 विकेट्सने मात केली. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. विंडिजचा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडिया मालिकेतील आव्हान कायम राखण्याच्या हेतून मैदानात उतरेल.
रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.