WI vs IND 3rd T20 | सूर्यकुमार-तिलक वर्मा जोडीचा झंझावात, टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय

| Updated on: Aug 08, 2023 | 11:59 PM

West Indies vs India 3rd T20I | टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत तिसरा टी 20 सामना जिंकणं बंधनकारक होतं.

WI vs IND 3rd T20 | सूर्यकुमार-तिलक वर्मा जोडीचा झंझावात, टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय
Follow us on

गयाना | सूर्यकुमार यादव याचं अर्धशतक, तिलक वर्मा याची फटकेबाजी आणि कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या फिनिशिंग टचच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. टीम इंडियासाठी हा करो या मरोचा सामना होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेतील आव्हान कायम राखलंय. टीम इंडिया या विजयासह विंडिजला मालिका जिंकण्यापासून रोखलंय. विंडिजने विजयासाठी दिलेलं 160 धावांचं आव्हान हे 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 83 धावांची खेळी केली. सूर्याने अवघ्या 44 बॉलमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 83 धावांची खेळी केली. तिलक वर्मा याने 37 बॉलमध्ये नॉट आऊट 49 रन्स केल्या. तर कॅप्टन हार्दिक पंड्या याने नाबाद 20 धावा करत फिनिशिंग टच दिला. मात्र टीम इंडियाची सलामी जोडी ही फ्लॉप ठरली. शुबमन गिल पुन्हा फ्लॉप ठरला. गिलने 6 धावा केल्या. तर डेब्यूटंट यशस्वी जयस्वाल याला 1 धावाच करता आली. विंडिजकडून अल्झारी जोसेफ याने 2 तर ओबेड मॅकॉय याने 1 विकेट घेतली.

दरम्यान त्याआधी विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विंडिजने 20 ओव्हरमध्ये 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. विंडिजकडून ब्रँडन किंग याने 42, कॅप्टन रोवमॅन पॉवेल 40, कायले मेयर्स 25, निकोलस पूरन 20 आणि जे चार्ल्स याने 13 धावा केल्या. शिमरॉन हेटमायर 9 धावांवर बाद झाला. तर रोमरियो शेफर्ड 2 धावांवर नाबाद परतला. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.