फ्लोरिडा | टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी 20 मालिकेतील चौथा सामना हा फ्लोरिडा येथील लॉडरहिलमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा चौथा टी 20 सामना 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर टीम इंडिया टी 20 सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यात ढेर झाली. विंडिजने टीम इंडियावर पहिल्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला. तर दुसरा सामना हा 2 विकेट्सने जिंकला. मात्र टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून आव्हान जिवंत ठेवलं.
चौथ्या सामन्यात जिंकून टीम इंडियाला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चौथा सामना हा अटीतचटीचा आहे. त्यामुळे कॅप्टन हार्दिक पंड्या चौथ्या मॅचसाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो.
टीम इंडियाच्या गोलंदाजांना गेल्या काही सामन्यांपासून विशेष काही करता आलेलं नाही. त्यामुळे हार्दिक पंड्या युवा गोलंदाजांना संधी देऊ शकतो. हार्दिक उमरान मलिक किंवा आवेश खान या दोघांपैकी एकाचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकतो. उमरान-आवेश या दोघांपैकी एकाला मुकेश कुमार याच्या जागी संधी मिळू शकते.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी गेल्या 3 सामन्यांमध्ये ढिसाळ कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्या याने 3 सामन्यात 80 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंह याने 98 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर मुकेश कुमार याने 2 विके्टससाठी 78 धावा लुटवल्या आहेत.
टीम इंडियाची बॅटिंग ही डोकेदुखीचा विषय ठरतोय. वनडे सीरिजमध्ये धमाका करणारा शुबमन गिल सपशेल अपयशी ठरलाय. शुबमने 3 टी 20 सामन्यांमध्ये फक्त 16 धावा केल्यात. संजू सॅमसनला संधीचं सोनं करण्यात अपयश आलं. संजूने 3 मॅचमध्ये 19 रन्स केल्या आहेत. तर ईशान किशन याने 2 मॅचमध्ये एकूण 33 रन्स केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल याला ईशान किशनच्या जागी खेळवण्यात आलं. ईशानने टी 20 पदार्पण केलं. ईशानकडून टी 20 मध्येही वादळी सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र यशस्वी पहिल्याच सामन्यात 1 धावेवर आऊट झाला.
टी 20 सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीम | रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.
विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.