WI vs IND 5th T20I | शुबमन गिल याला रिव्यू न घेणं महागात पडलं, सूर्यकुमार यादव देखील पाहत राहिला

| Updated on: Aug 13, 2023 | 9:00 PM

Shubman Gill LBW Out | विंडिज विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात अंपायरने शुबमन गिल याला आऊट नसतानाही आऊट दिलं. त्यामुळे सोशल मीडियावर संताप पाहायला मिळत आहे.

WI vs IND 5th T20I | शुबमन गिल याला रिव्यू न घेणं महागात पडलं, सूर्यकुमार यादव देखील पाहत राहिला
Follow us on

फ्लोरिडा | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20 सामन्यात टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल ssही सलामी जोडी मैदानात आली. शुबमन-यशस्वी जोडीने चौथ्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे टीम इंडियाने मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. आता पाचव्या सामन्यात या ओपनिंग जोडीकडून जबरदस्त सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र वेस्ट इंडिजच्या अकील होसेन याने तसं होऊ दिलं नाही.

अकील होसेन याने पहिल्याच ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल याला आऊट केलं. अकीलने यशस्वीला आपल्या बॉलिंगवर कॅच आऊट केलं. यशस्वीने 5 धावा केल्या. त्यानंतर अकील टीम इंडियाच्या डावातील तिसरी आणि आपल्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर शुबमन गिल याने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र शुबमनचा हा प्रयत्न फसला आणि बॉल थेट पॅडवर जाऊन लागला.

हे सुद्धा वाचा

बॉल पॅडवर लागल्याने अकीलने एलबीडबल्यूसाठी अपील केली. अंपायरने क्षणाचा विलंब न लावता शुबमनला आऊट बाद केलं. शुबमननेही रिव्हिव्यू न घेता तसाच मैदानाबाहेर निघून गेला. मात्र त्यानंतर जेव्हा रिप्ले दाखवण्यात आला. या रिप्लेमध्ये बॉल स्टंपच्या लाईनमध्ये नसल्याचं दिसून आलं. अंपायरच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका हा शुबमन गिल पर्यायाने टीम इंडियाला बसला. शुबमनने 9 बॉलमध्ये 9 धावा केल्या. शुबमन आऊट झाल्याने टीम इंडियाची 2.5 ओव्हरमध्ये 2 बाद 17 अशी स्थिती झाली.

कमनशिबी शुबमन गिल


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार) यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकील होसेन आणि अल्झारी जोसेफ.