Sanju Samson | अवघ्या 2 धावा आणि संजू सॅमसन याची ऐतिहासिक कामगिरी, टी 20 क्रिकेटमध्ये मोठा कारनामा

| Updated on: Aug 14, 2023 | 12:01 AM

WI vs IND 5TH T20I Sanju Samson | संजू सॅमसन याला सातत्याने संधी मिळूनही चमकदार कामगिरी करता आली नाही, मात्र त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.

Sanju Samson | अवघ्या 2 धावा आणि संजू सॅमसन याची ऐतिहासिक कामगिरी, टी 20 क्रिकेटमध्ये मोठा कारनामा
Follow us on

फ्लोरिडा | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने पाचव्या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. या पाचव्या सामन्यात शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल दोघेही अपयशी ठरले. शुबमन-यशस्वी या सलामी जोडीने चौथ्या सामन्यात तडाखेदार कामगिरी केली. मात्र पाचव्या सामन्यात दोघांनी निराशा केली. शुबमन 9 आणि यशस्वी 5 धावा करुन आऊट झाले. त्यानंतर तिलक वर्मा 27 धावा करुन माघारी परतला. तिलक आऊट झाल्यानंतर संजू सॅमसनला बढती देऊन वर खेळायला पाठवलं.

संजूकडून या निर्णायक सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. संजूने निराशा केली. संजूने 13 धावा करुन मैदानाबाहबेरची वाट धरली. मात्र संजूने 2 धावा करताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला. संजूने या 13 धावांच्या खेळीदरम्यान दुसरी धाव पूर्ण करताच मोठा कीर्तीमान आपल्या नावावर केला. संजूने टी 20 क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. संजू टी 20 क्रिकेटमध्ये 6 हजार धावा करणारा 13 वा भारतीय ठरला.

संजूने आतापर्यंत 245 टी 20 सामन्यात 6 हजार 11 धावा केल्या आहेत. संजूने या दरम्यान 3 शतकं आणि 38 अर्धशतकं झळकावली आहेत. संजूने टीम इंडियासह आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, दिल्ली डेयरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच संजू देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळचं प्रतिनिधित्व करतो.

हे सुद्धा वाचा

संजू 13 वा भारतीय

दरम्यान आतापर्यंत टीम इंडियाकडून रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा, महेंद्रसिंह धोनी, केएल राहुल, दिनेश कार्तिक, केएल राहुल, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, गौतम गंभीर आणि अंबाती रायडू 12 जणांनी 6 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. तर या यादीत आता संजू सॅमसन याचं नाव जोडलं गेलं आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कर्णधार) यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग ईलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकील होसेन आणि अल्झारी जोसेफ.