WI vs IND 5TH T20I | विंडिज-टीम इंडिया आमनेसामने, पाचव्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार?

| Updated on: Aug 13, 2023 | 4:54 PM

west indies vs india 5th 20i | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिका 2-2 ने बरोबरीत आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे.

WI vs IND 5TH T20I | विंडिज-टीम इंडिया आमनेसामने, पाचव्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार?
Follow us on

फ्लोरिडा | टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकली. त्यानंतर हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीत टीम इंडिया टी 20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया टी 20 सीरिज जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या सलामी जोडीच्या झंझावाताच्या मदतीने टीम इंडियाने विंडिज विरुद्धचा चौथा सामना जिंकून मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. आता मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा रंगतदार होणार आहे. दोन्ही संघांना मालिका विजयाची बरोबरीची संधी आहे. मात्र विजेता कोणतातरी एकच संघ होणार. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये पाचव्या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

टीम इंडियाचं कमबॅक आणि बरोबरी

वेस्ट इंडिजने टेस्ट आणि वनडे सीरिज गमावल्यानंतर टी 20 मालिकेत जोरदार कमबॅक केलं. विंडिजने टीम इंडियाला पाणी पाजत पहिल्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला. विंडिजने पहिल्या सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला. तर दुसरा सामना 2 विकेट्सने जिंकला. विंडिज अशा प्रकारे 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा आघाडीवर पोहचली.

आता टीम इंडियाला मालिकेतील प्रत्येक सामना हा करो या मरो असा झाला. टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून विजयाचं खातं उघडलं. तर चौथा सामना एकहाती जिंकून मालिकेत बरोबरी केली. आता पाचवा सामना हा 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे विंडिजचा टी 20 मालिका जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर टीम इंडियाची पाचव्या सामन्यात कशी कामगिरी राहते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

टी 20 सीरिजसाठी वेस्ट इंडिज टीम | रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.

विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.