मुंबई | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विंडिज विरुद्ध कसोटी वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने 23 जून रोजी कसोटी आणि वनडे सीरिजसाठी संघ जाहीर केला. त्यानंतर आता बीसीसीआयने टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने विंडिज विरुद्धच्या या टी 20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केलाय. अजित आगरकर यांची क्रिकेट सल्लागार समितीने 4 जुलै रोजी निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आगरकर यांनी खेळाडूंची निवड केली.
या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह इतरांचा समावेश आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या विंडिज विरुद्धच्या या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मुंबईकर सूर्यकुमार यादव याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा या दोघांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड करण्यात आली आहे.
विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया
Alert?: #TeamIndia's squad for T20I series against the West Indies announced. https://t.co/AGs92S3tcz
— BCCI (@BCCI) July 5, 2023
टीम इंडियात विंडिज विरुद्धच्या टी 20 सीरिजमधून फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याचं जवळपास 1 वर्षांनी पुनरागमन झालंय. रवीने अखेरचा टी 20 सामना 4 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला होता.
पहिला सामना, 3 ऑगस्ट.
दुसरा सामना, 6 ऑगस्ट.
तिसरा सामना, 8 ऑगस्ट.
चौथा सामना, 12 ऑगस्ट.
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.
हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
दरम्यान उभयसंघात टी 20 मालिकेआधी एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्य कुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, आर. जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.
पहिला सामना, गुरुवार 27 जुलै, बारबाडोस.
दुसरा सामना, शनिवार 29 जुलै, बारबाडोस.
तिसरा सामना, मंगळवार 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.
पहिली कसोटी, 12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका.
दुसरी कसोटी, 20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद.