वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 5 ते 11 डिसेंबर दरम्यान एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया मायदेशात विंडिज विरुद्ध खेळणार आहे. विंडिज भारत दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. विंडिजने या दोन्ही मालिकेसाठी बुधवारी 27 नोव्हेंबरला 14 सदस्यीय संघ जाहीर केला. विंडिजच्या या दौऱ्याची सुरुवात टी 20i मालिकेने होणार आहे. टी 20i मालिकेचं आयोजन हे 15 ते 19 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. हेली मॅथ्यूज टी 20i मालिकेत विंडिजचं नेतृत्व करणार आहे. तर शेमाइन कॅम्पबेल हीच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रं असणार आहेत.
या मालिकेतील तिन्ही सामने हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंचा एका स्टेडियमपासून दुसऱ्या स्टेडियमपर्यंत प्रवास करण्याचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सरावासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
या टी 20i मालिकेसाठी अद्याप भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये किंवा ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवड समितीकडून संघ जाहीर केला जाऊ शकतो. दरम्यान या टी 20i मालिकेनंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या एकदिवसीय मालिकेचं आयोजन हे 22 ते 27 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. या मालिकेतील तिन्ही सामनेही एकाच स्टेडियममध्ये होणार आहेत. बडोदा क्रिकेट स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत.
भारत दौऱ्यासाठी वूमन्स विंडिज टीम जाहीर
The #MaroonWarriors are back in action this holiday season! 🏏🎄
Read More🔽https://t.co/eTCxDs1nat#INDWvWIW pic.twitter.com/mV6x7LoJcD
— Windies Cricket (@windiescricket) November 27, 2024
पहिला सामना, 15 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
दुसरा सामना, 17 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
तिसरा सामना, 19 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
टी 20i मालिकेसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उप-कर्णधार), आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झैदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.