मुंबई | टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्यात दुसऱ्यांदा अपयश आलं. न्यूझीलंडनंतर आता ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. तसेच ऑस्ट्रेलिया आयसीसीची प्रत्येक ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम ठरली. आता टीम इंडिया हा पराभव विसरुन वेस्टइंडिज दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया विंडिज विरुद्ध कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाच्या या विंडिज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया विंडिज विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेला सुरवात करणार आहे. तर त्यानंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. या मालिकेला 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियासाठी आगामी वनडे वर्ल्ड कपच्या हिशोबाने ही मालिका महत्वाची अशी असणार आहे.
टीम इंडिया या मालिकेतूनच वनडे वर्ल्ड कपची तयारी करणार आहे. त्यामुळे या मालिकेत कोणला संधी द्यायची आणि कुणाला नाही, हे महत्वाचं असणार आहे. या निमित्ताने आपण टीम इंडियाचा संभावित संघ कसा अशू शकतो, कर्णधारपद कोण असणार हे सर्व जाणून घेऊयात.
एकूण 3 सामन्यांची हा मालिका वर्ल्ड कपच्या हिशोबाने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. या मालिकेत छाप सोडणाऱ्या खेळाडूंपैकी काही जणांना वर्ल्ड कपमध्ये संधी मिळू शकते. त्यामुळे या 3 सामन्यात खेळाडू जीव तोडून मेहनत करतील. विंडिज विरुद्धच्या या मालिकेसाठी मुख्य खेळाडूंचा समावेश होणार आहे.
टीम इंडियाच्या फलंदाजांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांचं स्थान निश्चित समजलं जातंय. या सीरिजमधून श्रेयसचं दुखापतीनंतर कमबॅक होऊ शकतं. तर इशान किशन आणि केएल राहुल या दोघांचा विकेटकीपर म्हणून समावेश केला जाऊ शकतो.
वेस्टइंडिज विरुद्धच्या टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिकांचं वेळापत्रक
India will begin their tour of West Indies with the Test series that starts on July 12 ?
Full schedule ?https://t.co/xhkJl1nN27
— ICC (@ICC) June 13, 2023
तसेच ऑलराउंडर म्हणून हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा समावेश केला जाऊ शकतो. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या कुलचा जोडीकडे फिरकी गोलंदाजाची जबाबदारी असेल. तर मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी,उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या चौकडीवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल.
पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.
दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.
तिसरा सामना – 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.