मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं. (WI vs IND) टीम इंडियाने दोनवेळा फायनलपर्यंत धडक मारली मात्र अंतिम सामन्यात संघाच्या पदरी कायम हार पडली. विराट कोहली कर्णधार असताना न्यूझीलंडने टीम इंडियाला नमवत पहिल्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं होतं त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघाने हा कारनामा केला. मात्र फायनलमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य कोच राहुल द्रविड यांचा एक निर्णय कायम सर्वांच्या आठवणीत राहणारा आहे. हा निर्णय काही सकारात्मक म्हणून नाही तर त्यांच्या करिअरमधील चूक म्हणूनच लक्षात राहिल.
ऑस्ट्रेलिया आणि भारत अंतिम सामन्यामध्ये जो संघ निवडला होता त्यामध्ये आर. अश्विन याला संधी न दिली गेली नव्हती. यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात याची चर्चा झाली होती, ज्या खेळाडूमुळे तुम्हाला फायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिक बजावली त्याच खेळाडूला बेंचवर बसवणं हे सर्वांसाठी धक्कदायक होतं. मात्र अश्विन काही हार माननारा नाही. हे पठ्ठ्याने आपल्या कामगरीमधून अनेकदा दाखवून दिलं आहे. कुलदीप यादव आणि चहल संघात आल्यावर अश्विनला आता संघात जागा मिळते की नाही याबाबत शंका होती. पण भावड्याने जागा तर मिळवलीच त्यासोबतच कमबॅक काय असतं ते दाखवून दिलं.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी अश्विनने अर्धा कॅरेबियन संघ तंबूत पाठवला. वेस्ट इंडिजच्या डावाला सुरूवात झाल्यावर सावध पवित्रा घेतलेल्या कार्लोस ब्रेथवेट आणि चंद्रपॉल यांची जोडी फोडत अश्विनने चंद्रपॉलला बोल्ड करत संघाचं खातं उघडलं. वेस्ट इंजिडचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला यामधील 60 धावांमध्ये अश्विनने 5 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, अश्विनला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं असतं तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता. अश्विनने आपला लढवय्या बाणा कायम ठेवला असून विक्रमांणा गवसणी घालत आहे.