गयाना | वेस्ट इंडिज क्रिकेट टीमने भारतीय संघावर पहिल्या टी 20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला. विंडिजने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत 150 धावांआधी रोखलं. मात्र फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात टीम सामना विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. या दुसऱ्या टी 20 मॅचबाबत जाणून घेणार आहोत.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी 20 सामना हा रविवारी 6 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी 20 सामना हा गुयाना इथील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया दुसऱ्या टी 20 सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा टी 20 सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल.
फॅनकोड app आणि जिओ सिनेमाच्या माध्यामातून क्रिकेट चाहते मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहू शकतात.
विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी 20 सीरिजसाठी अशी आहे वेस्ट इंडिज क्रिकेट टीम | रोवमॅन पॉवेल (कॅप्टन), कायले मेयर्स (उपकर्णधार), जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेज, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ओशाने थॉमस, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅककॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड आणि ओडियन स्मिथ.