मुंबई | क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची उत्सूकता लागून राहिली आहे. टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला आता मोजून 8 दिवस बाकी आहेत. टीम इंडिया या दौऱ्याला कसोटी मालिकेने सुरुवात करणार आहे. एकूण 2 सामन्यांची मालिका असणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित शर्मा कॅप्टन्सी करणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रं आहेत. निवड समितीने या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या 3 युवा खेळाडूंची पहिल्यांदाच निवड केली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे.
या तिघांची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियात राखीव खेळाडू म्हणून सहभागी करण्यात आलं होतं. मात्र ऋतुराजला लग्नामुळे wtc final साठी लंडनला जाता आलं नाही. त्यामुळे ऋतुराजच्या जागी यशस्वी जयस्वाल याला संधी देण्यात आली. या मोठ्या सामन्यात मुकेश कुमार आणि यशस्वी जयस्वाल या दोघांचा सराव झाला.
आता निवड समितीने यशस्वी, ऋुतराज आणि मुकेश यांचा मुख्य संघात समावेश केला आहे. विंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुकेश कुमार याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया, पहिली कसोटी, 12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया, दुसरी कसोटी, 20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद.
विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.
पहिला सामना, 27 जुलै, बारबाडोस.
दूसरा सामना, 29 जुलै, बारबाडोस.
तिसरा सामना , 1 ऑगस्ट, त्रिनिदाद.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.