डोमिनिका | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया कसोटी मालिकेने या दौऱ्याचा श्रीगणेशा करणार आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर अजिंक्य रहाणे याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर क्रॅग ब्रेथवेट विंडिजचा कॅप्टन आहे. टीम इंडिया या कसोटी मालिकेच्या निमित्ताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 फेरीला श्रीगणेशा करणार आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला सामना हा विंडसर पार्क, डोमिनिका इथे खेळवण्यात येणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील कसोटी सामना हा टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा मोबाईलवर फॅनकोड आणि जिओ सिनेमावर पाहता येईल.
क्रॅग ब्रेथवेट (कॅप्टन), जर्मेन ब्लॅकवूड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, टेगेनारिन चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.
रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.