नवी दिल्ली : सेंट किट्स येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर (IND vs WI) 5 विकेट्सनं मात केली . यजमान संघानं हा सामना 4 चेंडू राखून जिंकला. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं टीम इंडियाला (India) प्रथम फलंदाजी दिली. भारतीय संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 138 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात कॅरेबियन संघानं 139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 19.2 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं. या सामन्याच्या निकालानं टीम इंडियासाठी (Indian cricket team) अनेक प्रश्न सोडून वेस्ट इंडिजला मालिकेत बरोबरी साधण्याचं काम केले. जेव्हा टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये दुसरा T20 हरत होती, तेव्हा भारत मध्यरात्री येथे झोपला होता. अशा परिस्थितीत तुमचा संघ का हरला, सामन्याच्या कोणत्या टप्प्यावर हरला, कसा हरला हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. सामन्यात नेमकं काय झालं, याविषयी देखील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा आहे. याचविषयी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. जाणून घ्या…
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयनं भेदक गोलंदाजी केल्यानं भारताचा पराभव झाला. त्यानं भारताचा निम्मा संघ 17 धावांत गुंडाळला. 6 विकेट्ससह, McCoy T20I मध्ये वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम फिगर गोलंदाज बनला. दुसरीकडे, भारताविरुद्ध कोणत्याही फॉरमॅटमध्ये कोणत्याही कॅरेबियन गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
Early tumble of wickets for India, a product of their aggression against the new ball. Can they rebuild?
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, only on #FanCode ? https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/zPNAo0P91d
— FanCode (@FanCode) August 1, 2022
139 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंगनं 52 चेंडूत 68 धावा केल्या. 13 षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या 3 बाद 83 अशी असताना त्याने या धावा केल्या. म्हणजेच प्रकरण अडकले होते.
#BrandonKing‘s cool and collected innings was key to securing West Indies’ first win of the series! A sensational knock.
Watch the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode ? https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/zGrnej5vig
— FanCode (@FanCode) August 1, 2022
शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 10 धावांची गरज होती. 2 षटके शिल्लक असल्यानं तो भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी करेल असं सर्वांना वाटत होतं. मात्र कर्णधार रोहित शर्मानं चेंडू आवेश खानकडं सोपवला. पहिल्याच चेंडूवर तो दडपणाखाली आला आणि त्याने नो बॉल टाकला. त्याचा परिणाम असा झाला की, सिक्स मारणाऱ्या वेस्ट इंडिजला फ्री हिट देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चार आणि सामना तिथेच संपला.
.@Avesh_6‘s untimely no-ball served perfectly for Windies, and #DevonThomas hit a stylish four to secure the win!
Watch the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode ? https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/toZ2wgKrkX
— FanCode (@FanCode) August 1, 2022
भारतीय फलंदाजीची अवस्था बिकट दिसत होती. टीम इंडिया पूर्ण ओव्हरही खेळू शकली नाही. 14व्या षटकापर्यंत 4 बाद 104 धावा झाल्या होत्या. पण नंतर पुढील 34 धावांमध्ये उर्वरित 6 विकेट गमावल्या, तेही भारतीय डावाचे 2 चेंडू शिल्लक असताना.
मालिकेतील तिसरा सामना या मैदानावर आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असेल.