दक्षिण आफ्रिकेला वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 16 धावांची आघाडी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडिजला पहिल्या डावात 144 धावांवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्या डावात ऑलआऊट 160 धावा केल्या. त्यानंतर विंडिजला पहिल्या डावात शानदार कामगिरी करुन मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने तसं होऊ दिलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर विंडिजला 42.4 ओव्हरमध्ये 144 धावांपर्यंतच पोहचता आलं. जेसन होल्डर आणि शामर जोसेफ या जोडीने दहाव्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतरही विंडिजला 150 पार मजल मारता आली नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेका 16 धावांची आघाडी मिळाली.
विंडिजसाठी फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तर चौघे 10 धावांच्या आतच ऑलआऊट झाले. जेसन होल्डर याने सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. होल्डरने 88 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह या धावा केल्या. केसी कार्टी याने 26 धावा जोडल्या. गुडाकेश मोटी याने 11 रन्स केल्या. तर शामर जोसेफ याने 5 विकेट्स घेतल्यानंतर बॅटिंगनेही योगदान दिलं. शामरने होल्डरसह 10 व्या विकेटसाठी भागीदारी करताना 25 धावांची खेळी केली. याच भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला मोठी आघाडी मिळाली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून वियान मुल्डर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर याने शामर जोसेफ प्रमाणे बॅटिंगसह बॉलिंगनेही योगदान दिलं. नांद्रेने 3 विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कगिसो रबाडाने 1 विकेट घेतली. त्याआधी दक्षिण आफ्रिकेने 54 ओव्हरमध्ये ऑलआऊट 160 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी डेन पिएड आणि नांद्रे बर्गर या दोघांनी दहाव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली.
पिएड आणि बर्गर या दोघांनी अनुक्रमे 38 आणि 23 अशा धावा केल्या. तर विंडिजकडून शामर जोसेफ याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. शामरची कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्स घेण्याची ही पहिली तर एकूण तिसरी वेळ ठरली. जेडेन सील्स याने तिघांना बाद केलं. तर जेसन होल्डर आणि गुडाकेश मोटी या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दक्षिण आफ्रिकेकडे 16 धावांची आघाडी
🟢🟡Change of Innings | SAvWI
🇿🇦South Africa post 160/10 (1st Innings)
🏝️West Indies 144/10 (1st Innings)Time to capitalise on our lead and build a good one for the hosts to chase! 💥#WozaNawe #BePartOfIt#SAvWI pic.twitter.com/EVbdlFOldF
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 16, 2024
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.