WI vs SA: केशव महाराजचा धमाका, दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच स्पिनर

| Updated on: Aug 18, 2024 | 9:59 PM

Keshav Maharaj West Indies vs South Africa : केशव महाराज याने आपल्या फिरकीच्या जोरावर विंडिज विरुद्धची कसोटी मालिका गाजवली. केशवने दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली.

WI  vs SA: केशव महाराजचा धमाका, दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच स्पिनर
keshav maharaj south africa
Image Credit source: Icc X account
Follow us on

दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर आणि रामभक्त केशव महाराज याने इतिहास रचला आहे. महाराजने विंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कारनामा केला आहे. दक्षिण आफ्रिकने गयाना येथील प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात विंडिजवर 40 धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह 2 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. केशवने या सामन्यात ह्यू टेफील्ड याचा 64 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा स्पिनर ठरला आहे.

केशवने विंडिज विरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे केशवला ह्यू टेफील्ड याचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 5 विकेट्सची गरज होती. केशवने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 8 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात 37 रन्स देत तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. केशवने अशाप्रकारे 17 षटकांमध्ये 45 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आणि इतिहास रचला. केशवने या मालिकेत एकूण 13 विकेट्स घेतल्या. त्यासाठी केशवला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. केशवने पहिल्या सामन्यात 40 टाकल्या. केशव यासह गेल्या 15 वर्षांमध्ये एका स्पेलमध्ये सर्वात जास्त ओव्हर टाकणारा पहिला फलंदाज ठरला.

केशव महाराजची कसोटी कारकीर्द

केशव महाराज याने 52 कसोटी सामन्यांमध्ये 30.78 च्या सरासरीने 171 विकेट्स घेतल्या आहेत. केशवने या दरम्यान 5 वेळा 5 आणि 1 वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. केशवची 129 धावांच्या मोबदल्यात 9 विकेट्स ही एका डावातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

केशव महाराजची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.