वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गयाना येथील प्रोव्हीडन्स स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र विंडिजच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला झटपट धक्के देत अप्रतिम सुरुवात केली. जेडेन सील्स याने टोनी डी झॉर्झी याला बोल्ड करत विंडिजला पहिली विकेट मिळवून दिली. जेडनने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील तिसर्या बॉलवर झॉर्झीला आऊट केलं. झॉर्झी 10 बॉलमध्ये 1 धाव करुन माघारी परतला. त्यानंतर शामर जोसेफने 11 व्या ओव्हरमध्ये धमाका केला.
जेडेन सील्सने झॉर्झीला आऊट केल्याने दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 1 आऊट 8 असा होता. त्यानंतर शामर जोसेफने 11 व्या ओव्हरमधील तिसऱ्या आणि पाचव्या बॉलवर विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 2 झटके दिले. शामरने एडन मार्करम याला 14 धावावंर क्लिन बोल्ड केलं. त्यानंतर शामरने कॅप्टन टेम्बा बावुमा याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शामरने टेम्बाला खातंही उघडू दिलं नाही. शामरने टेम्बाला दुसऱ्याच बॉलवर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 10.5 ओव्हरनंतर 3 बाद 20 अशी नाजूक स्थिती झाली. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सत्रात लंचपर्यंत 26 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 64 धावा केल्या आहेत.
पहिलं सत्र विंडिजच्या नावावर
WI take the 1st session on Day 1️⃣.🏏
Live Scorecard⬇️https://t.co/Q5aW47yTBA #WIvSA | #MenInMaroon pic.twitter.com/pk6pSv9MM9
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2024
दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना हा अनिर्णित राहिला. त्यामुळे 2 सामन्यांची मालिका 0-0 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सीरिजमधील दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी आहे.
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.