दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटीतील पहिला डाव हा 160 धावांवर आटोपला आहे. दक्षिण आफ्रिकेने 54 ओव्हरमध्ये 160 धावा केल्या पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडिजच्या धारदार बॉलिंगसमोर गुडघेच टेकले. शामर जोसफे याने 5 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर ढकलण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 9 बाद 97 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका 100 धावा तरी करणार की नाही? असा प्रश्न दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग पाहून उपस्थित करण्यात येत होता. मात्र शेवटच्या जोडीने दक्षिण आफ्रिकेची लाज राखली. शेवटच्या जोडीने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला 160 धावांपर्यंत पोहचता आलं.
दक्षिण आफ्रिकेची 9 बाद 97 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर नांद्रे बर्गर आणि डेन पिएड या जोडीने दक्षिण आफ्रिकेची लाज राखली. या दोघांनी 63 धावांची भागीदारी केली. त्यानंतर नांद्रे बर्गर आऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला. नांद्रे बर्गर याने 56 बॉलमध्ये 23 धावांची झुंजार खेळी केली. तर डेन पिएड याने टीमसाठी सर्वाधिक धावा केल्या. डेन पिएडने 60 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 फोरसह नॉटआऊट 38 रन्स केल्या. त्या व्यतिरिक्त डेव्हिड बेडिंगहॅम याने 28, ट्रिस्टन स्टब्स 26 आणि काइल वेरेन याने 21 धावांच योगदान दिलं. तर एडन मारक्रम 14 धावा करुन माघारी परतला. चौघे आले तसेच परत गेले. यांना भोपळाही फोडता आला नाही. तर ओपनर टॉनी डी झॉर्झी 1 रन करुन मैदानाबाहेर गेला.
Clinical with the ball, the #MenInMaroon head out to the middle after the break! 🏏🔥#WIvSA pic.twitter.com/KAdpnEucur
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2024
विंडिजकडून शामर जोसेफ याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. शामरची कसोटी कारकीर्दीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5 विकेट्स घेण्याची पहिली तर एकूण तिसरी वेळ ठरली. जेडेन सील्स याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जेसन होल्डर आणि गुडाकेश मोटी या दोघांनी 1-1 विकेट घेतली. आता विंडिज आता पहिल्या डावात किती धावांची आघाडी घेते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.