दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात सध्या विंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा बरोबरीत सुटला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन टेम्बा बावुमा याने वेस्ट इंडिज विरुद्ध बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. विंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
टेम्बा बावुमा आणि क्रेग ब्रेथवेट या दोन्ही कर्णधारांनी दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. रायन रिकेल्टन याच्या जागी डेन पिएड याला संधी देण्यात आली आहे. तर लुंगी एन्गिडीच्या जागी नांद्रे बर्गर याचा समावेश करण्यात आल्याची माहिती बावुमा याने दिली.तर विंडिजमध्ये शामर जोसेफ याला संधी देण्यात आली आहे. तर केमार रोच याला विश्रांती देण्यात आली आहे.
उभयसंघात 31 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान खेळवण्यात आलेला पहिला सामना हा बरोबरीत सुटला. त्यामुळे आता दुसर्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी दोन्ही संघांना आहे. आता हा सामना जिंकणार की पुन्हा बरोबरीत सुटणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
यजमान विंडिज सज्ज
Joseph 🔄 Kemar for the 2nd Test v South Africa!🌴🇿🇦#WIvSA #MenInMaroon pic.twitter.com/DEVRkhxHV5
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2024
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.