मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी क्वालिफायर स्पर्धेतून श्रीलंका आणि नेदरलँड संघ पात्र ठरले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका हा सामना फक्त औपचारिक होता असंच म्हणावं लागेल. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिज संघाला 243 धावांवर रोखण्यात श्रीलंकन गोलंदाजांना यश आलं. तर विजयासाठी दिलेल्या 244 धावा श्रीलंकेने 2 गडी गमवून 44.2 षटकात पूर्ण केल्या. श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना बाद करण्यात वेस्ट इंडिजला यश आलं. या सामन्यात केविन सिनक्लेयरने पाथुम निसांक्काची विकेट घेतली आणि वेगळंच सेलिब्रेशन केलं. त्याच्या सेलिब्रेशनची आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
वेस्ट इंडिजने दिलेल्या 244 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेकडून पाथुम निस्सांका आणि दिमुथ करुणारत्ने ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 190 धावांची भागीदारी केली आणि विजय सोपा केला. ही जोडी फोडण्यात केविन सिनक्लेयर याला यश आलं. शतकी खेळी करणाऱ्या पाथुम निस्सांकाला तंबूत पाठवलं. त्याच्या गोलंदाजीवर रोस्टोन चेसने झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर साजरा केलेला आनंद चर्चेच आहे.
Just Kevin SinclAIR things ✈#CWC23 pic.twitter.com/ncrz7CDo7D
— ICC (@ICC) July 7, 2023
यापूर्वीही केविन सिनक्लेयर याने असाच आनंद साजरा केला आहे. त्यामुळे विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करण्याची त्याची एक स्टाईल आहे, असं क्रिकेटप्रेमींना माहिती आहे.
4 Wickets ✅
Back Flip Celebration ✅
Kevin Sinclair was at his best for West Indies?#UAEvsWI pic.twitter.com/fLIrOZA1U6
— FanCode (@FanCode) June 9, 2023
48 वर्षात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज संघ वनडे वर्ल्डकपसाठी अपात्र ठरला आहे. वनडे वर्ल्डकप क्वॉलिफायर स्पर्धेत नेदरलँड, झिम्बाब्वे आणि स्कॉटलँडसारख्या दुबळ्या संघाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. यामुळे वेस्ट इंडिज क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. सोशल मीडियावर याबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. वनडे वर्ल्ड दर चार वर्षांनी होतो. तर वनडे वर्ल्डकप इतिहासात वेस्ट इंडिजने दोन वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.
वेस्ट इंडिजचा संघ : ब्रँडन किंग, जॉनसन चार्ल्स, शरमाह ब्रूक्स, शाय होप, निकोलस पूरन, कीसी कॅर्टी, कायल मेयर्स, रोस्टोन चेस, रोमारियो शेफर्ड, केविन सिनक्लेयर, अकिल होसेन
श्रीलंकेचा संघ : पाथुम निस्सांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदीरा समाराविक्रमा, चरिथ असालंका, सहान अरच्चिगे, दासुन शनाका, दुशन हेमांथा, महीश थीकक्षाना, मथीशा पथिराना, दिशान मधुशंका