वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारतीय संघाला एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका, न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका आहे. भारताला अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी 10 पैकी 5 कसोटी सामने जिंकावेच लागणार आहेत. त्यामुळे बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतणं खूपच आवश्यक आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडियाचे सिलेक्टर्स त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आराम देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणखी दोन महिने टीम इंडियापासून दूर असेल असं सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अधिकृत असं काहीच सांगण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, मालिका भारतात होणार आहे. तसेच शमीचं कमबॅक पाहता सिलेक्टर्स तसा निर्णय घेऊ शकतात.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहला खेळवायचं की नाही, याबाबत निवड समिती विचार विनिमय करू शकते. टीम इंडियाचं शेड्युल पाहूनचं निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. भारताला पुढच्या चार महिन्यात एकूण 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यात 5 कसोटी सामने ऑस्ट्रेलियात होणार आहेत. त्यामुळे निवड समिती बुमराहबाबत योग्य ती काळजी घेताना दिसत आहे. भारतात फिरकिला मदत करणाऱ्या खेळपट्टी आहेत. तसेच मोहम्मद शमीचं कमबॅक करणार असल्याने बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
जसप्रीत बुमराहला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत आराम दिला गेला तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कमबॅक करू शकतो. न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर महिन्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या कसोटी मालिकेची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होणार आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह मैदानात परतेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे प्रत्येक कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारताने सलग दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एन्ट्री मारली होती. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली.