मुंबई | वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स इंग्लंड क्रिकेट टीम यांच्यात आज 6 डिसेंबरपासून 3 टी 20 मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यातून टीम इंडियाकडून दोघींनी पदार्पण केलं आहे. टीम इंडियाकडून श्रेयंका पाटील आणि साइका इशाक या दोघींनी टी 20 पदार्पण केलं आहे. स्मृती मंधाना हीने श्रेयंका पाटील हीला टीम इंडियाची कॅप देऊन स्वागत केलं. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने साइका ईशाक हीला कॅप देत टीममध्ये स्वागत केलं. यावेळेस टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनीही या दोघींचं स्वागत केलं.
दरम्यान उभयसंघात एकूण 3 सामन्यांची ही मालिका होणार आहे. मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना हा शनिवार 10 आणि रविवार 11 डिसेंबर रोजी होणार आहे. हे दोन्ही सामनेही मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना हे सामने फुकटात वानखेडे स्टेडियममध्ये जाऊन पाहता येणार आहेत. एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत क्रिकेट चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.
साइका ईशाक आणि श्रेयंका पाटीलचं पदार्पण
A round of applause for #TeamIndia Debutants 👏👏
Captain @ImHarmanpreet hands over the 🧢 to Saika Ishaque & Vice-captain @mandhana_smriti hands over the 🧢 to @shreyanka_patil 👏👏#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/i7a2fKG5vg
— BCCI Women (@BCCIWomen) December 6, 2023
वूमन्स टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयांका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग आणि सायका इशाक.
वूमन्स इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | हेदर नाइट (कर्णधार), डॅनियल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल आणि माहिका गौर.