वूमन्स टीम इंडियाने 2024 वर्षाचा अप्रतिम शेवट केला. महिला ब्रिगेडने वेस्ट इंडीज क्रिकेट टीमला एकदिवसीय मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केलं. त्यानंतर आता टीम इंडिया नववर्षात पहिली आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात आयर्लंडविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत स्मृती मानधना टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर दीप्ती शर्मा उपकर्णधार म्हणून स्मृतीला मदत करेल. तर गॅबी लुईस हीच्याकडे आयर्लंडचं कर्णधारपद सांभाळणार आहे. हा सामना कुठे आणि कधी होणार? जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड पहिला सामना शुक्रवारी 10 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड पहिला सामना सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, राजकोट येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड पहिल्या सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड पहिला सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड पहिला सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.
आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा चेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.
एकदिवसीय मालिकेसाठी आयर्लंड महिला संघ : गॅबी लुईस (कॅप्टन), एवा कॅनिंग, क्रिस्टीना कूल्टर रीली, अलाना डाल्जेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉगरन, एमी मॅगुइरे, लिआ पॉल, ओरला प्रेंडरगॅस्ट, ऊना रेमंड-होए, फ्रेया सार्जेंट आणि रेबेका स्टोकेल.