वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स आयर्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. भारत दौऱ्यावर असलेली पाहुणी आयर्लंड महिला क्रिकेट संघ या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा एकतर्फी फरकाने पिछाडीवर आहे. एका बाजूला टीम इंडियाने सलग 2 सामने जिंकत नववर्षातील पहिलीच मालिका जिंकली आहे. तर आयर्लंडला अजून पहिल्या विजयाची चवही चाखता आलेली नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काय निकाल लागतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तिसरा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल? सामन्याला किती वाजता सुरुवात होईल? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना बुधवारी 15 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना हा निरंजन शाह स्टेडियम, राजकोट येथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल. तर 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया वूमन्स विरुद्ध आयर्लंड तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
आयर्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजासाठी टीम इंडिया : स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा चेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.
आयर्लंड वूमन्स टीम : गॅबी लुईस (कॅप्टन), एवा कॅनिंग, क्रिस्टीना कूल्टर रीली, अलाना डाल्जेल, लॉरा डेलानी, जॉर्जिना डेम्पसी, सारा फोर्ब्स, अर्लीन केली, जोआना लॉगरन, एमी मॅगुइरे, लिआ पॉल, ओरला प्रेंडरगॅस्ट, ऊना रेमंड-होए, फ्रेया सार्जेंट आणि रेबेका स्टोकेल.