टीम इंडियाची सलामीवीर आणि तडाखेदार फलंदाज स्मृती मंधाना हीचा तडाखा कायम आहे. स्मृतीने मायदेशात विंडीजविरुद्ध धमाकेदार खेळी केली होती. स्मृतीने हाच झंझावात आयर्लंडविरुद्धही कायम ठेवला आहे. स्मृतीचं आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक हुकलं होतं. स्मृती 41 धावांवर आऊट झाली होती. मात्र स्मृतीने दुसऱ्या सामन्यात सर्व भरपाई केली आहे. स्मृतीने पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या सामन्यात 32 धावा जास्त केल्या. तसेच स्मृतीने प्रतिका रावलसह 156 धावांची सलामी भागीदारी केली.
स्मृतीने पहिल्या सामन्यात 6 चौकार आणि 2 षटकारांसह 29 चेंडूत 41 धावा केल्या होत्या. तर आता दुसऱ्या सामन्यात 54 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 73 धावा केल्या. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 30 वं अर्धशतक ठरलं. स्मृतीने अशाप्रकारे या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांमध्ये 83 चेंडूत एकूण 114 धावा केल्या आहेत.
तसेच स्मृतीने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील अर्धशतकासह खास कामगिरी केली. स्मृतीने गेल्या 6 पैकी 4 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा केल्या. स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात 11 डिसेंबरला 105 धावा केल्या. तर विंडीजविरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यात अनुक्रमे 91 आणि 53 धावा केल्या. तर स्मृतीने उर्वरित 2 डावांमध्ये 4 आणि 41 धावा केल्या.
स्मृती मंधाना हीचा तडाखा सुरुच
Half-century number 3⃣0⃣ in ODIs for Captain Smriti Mandhana! 👏👏
Hundred partnership comes up for the opening wicket 🔥
Updates ▶️ https://t.co/zjr6BQy41a#TeamIndia | #INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/tGLWm4SqJ9
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मंधाना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तितस साधू.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, अलाना डालझेल आणि फ्रेया सार्जेंट.