न्यूझीलंड वूमन्सने टीम इंडियाला नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 260 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 259 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडकडून कॅप्टन सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्स या जोडीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर मॅडी ग्रीन आणि जॉर्जिया प्लिमर या जोडीने 40 पेक्षा अधिक धावांची भर घातली. तर टीम इंडियाकडून राधा यादव हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे 260 धावा करुन मालिका जिंकण्याची संधी आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. न्यूझीलंडसाठी कॅप्टन सोफी डिव्हाईन, सुझी बेट्स, मॅडी ग्रीन आणि जॉर्जिया प्लिमर
या चौघींना चांगली सुरुवात मिळाली. मात्र चौघींपैकी एकीलाही या खेळीचं मोठ्या धावांमध्ये रुपांतर करता आलं नाही. डिव्हाईन आणि बेट्स या दोघींनी अर्धशतकी खेळी केली. तर मॅडी आणि जॉर्जिया या दोघींना तिथवरही पोहचता आलं नाही. सोफीने 86 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने 79 रन्स केल्या. सुझी बेट्सने 70 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. मॅडी ग्रीन हीने 41 चेंडूत 42 धावांची भर घातली. तर जॉर्जियाने 6 चौकार आणि 1 षटाकारासह 41 धावा जोडल्य.तर इतरांना काही खास करता आलं नाही.
टीम इंडियाकडून एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी तिघींनाच यश मिळालं. राधा यादव हीने 10 षटकांमध्ये 69 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्माने दोघींना बाद केलं. तर साईमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
भारतासमोर 260 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Innings Break!
Radha Yadav’s 4️⃣ wickets restrict New Zealand to 259/9
Chase coming up shortly ⏳
Updates ▶️ https://t.co/h9pG4I31li#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Mf3kvhOqXs
— BCCI Women (@BCCIWomen) October 27, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मंधाना, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.
वूमन्स न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कॅप्टन), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), जेस केर, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.