वूमन्स टीम इंडियाने वेस्ट इंडिजला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी 359 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं आहे. हर्लीन देओल हीचं शतक आणि तिघींच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 358 धावा केल्या. हर्लिन देओल हीने सर्वाधिक 115 धावा केल्या. तर प्रतिका रावलने 76, स्मृती मानधना 53 आणि जेमिमाह रॉड्रिग्स हीने 52 धावा केल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 22 धावांचं योगदान दिलं. तर रिचा घोष आणि दीप्ती शर्मा या दोघी नाबाद परतल्या. रिचाने 13 आणि दीप्तीने 4 धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली आहे. त्यानंतर आता भारतीय गोलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. आता या सामन्याचा काय निकाल लागतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौर हीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. हर्लीनने 103 बॉलमध्ये 16 फोरसह 115 रन्स केल्या. प्रतिका रावलने 86 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 76 धावा जोडल्या. स्मृती मंधाना हीने अर्धशतकांचा षटकार लगावला.स्मृतीने 47 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह 53 रन्स केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्सने 36 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्स ठोकून 52 रन्स केल्या. कॅप्टन हरमनप्रीत कौरने 18 बॉलमध्ये 22 रन्स केल्या. तर रिचा घोष 13 आणि दीप्ती शर्मा 4 धावांवर नाबाद परतल्या. विंडीजकडून चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाच्या 358 धावा
Innings Break!#TeamIndia post a mammoth total of 358/5 in their innings with some top notch batting display 🔥
Over to our bowlers 👊
Updates ▶️ https://t.co/u2CL80qolK#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/7w3TgUHaQS
— BCCI Women (@BCCIWomen) December 24, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग आणि प्रिया मिश्रा.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, रशादा विल्यम्स, डिआंड्रा डॉटिन, नेरिसा क्राफ्टन, शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), आलिया ॲलेने, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल आणि ऍफी फ्लेचर.