वूमन्स विंडिज क्रिकेट टीमने दुसऱ्या टी 20I सामन्यात पलटवार केला आहे. विंडिजने टीम इंडियाचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजने हे आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून सहज पूर्ण केलं. कॅप्टन हॅली मॅथ्यूज ही विंडिजच्या विजयाची नायिका ठरली. हॅलीने सर्वाधिक आणि नाबाद 85 धावांची खेळी केली. तर कियाना जोसेफ आणि शेमेन कॅम्पबेले या दोघींनीही शानदार खेळी करत विजयात योगदान दिलं. विंडिजने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
हॅली मॅथ्यूज आणि कियाना जोसेफ या सलामी जोडीने विस्फोटक सुरुवात केली. या दोघींनी 66 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर कियाना जोसेफ 22 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 38 रन्स करुन आऊट झाली. त्यानंतर हॅली मॅथ्यूज आणि शेमेन कॅम्पबेले या जोडीनेच विंडिजला विजय मिळवून दिला. मॅथ्यूज आणि कॅम्पबेले या दोघांनी दुसर्या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी केली. हॅली मॅथ्यूज हीने 47 बॉलमध्ये 17 फोरसह नॉट आऊट 85 धावा केल्या. तर शेमेन कॅम्पबेले हीने 26 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या. टीम इंडियाकडून सायमा ठाकोर हीने एकमेव विकेट घेतली. तर इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियासाठी कॅप्टन स्मृती मंधाना आणि रिचा घोष या जोडीने केलेल्या खेळीमुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 62 धावा केल्या. तर रिचा घोषने 32 धावाा जोडल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी केली. विंडिजच्या 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
विंडिजकडून मालिकेत बरोबरी
West Indies win the 2nd T20I and level the series 1⃣-1⃣
Scorecard ▶️ https://t.co/msHanvwQsI#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/41XLmKDvnI
— BCCI Women (@BCCIWomen) December 17, 2024
वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), राघवी बिस्त, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.
वूमन्स विंडीज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेले (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनबी, जैदा जेम्स, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचे आणि करिश्मा रामहरक.